---Advertisement---
जळगाव शहर

ॲड. उज्ज्वल निकम यांना ‘मुंबई रत्न’ पुरस्कार प्रदान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२१ ।  विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 31 निवडक व्यक्तींना राज्यपाला भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे ‘मुंबई रत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यात 

ujjwal nikam award jpg webp

विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांना देखील ‘मुंबई रत्न’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. निकम यांनी हा पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्वीकारला. फिल्म्स टुडे, नाना नानी फाउंडेशन व एनार समूहातर्फे सदर पुरस्कार देण्यात आले.

---Advertisement---

या कार्यक्रमात ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासह गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदि गोदरेज, मनपा आयुक्त इक्बालसिंग चहल, बांधकाम उद्योजक निरंजन हिरानंदानी, अधिवक्ता उज्ज्वल निकम, इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे अनंत गोयनका, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. गौतम भन्साळी, मंजू लोढा, पार्श्वगायक उदित नारायण, अनूप जलोटा, युनियन बँकेचे चेअरमन राजकिरण राय, डॉ. शोमा घोष, आशिष चौहान आदींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, उद्योजक, कलाकार, वकील, वैद्यकीय तज्ज्ञ हे सर्व जण आपापल्या परीने समाजात योगदान देत आहेत. परंतु प्रत्येकाने देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच गरीबी निर्मूलनासाठी आरोग्य सेवा व शिक्षण देऊन अधिकाधिक समाजात योगदान द्यावे असे आवाहन राज्यपालांनी याप्रसंगी केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---