⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

ॲड. उज्ज्वल निकमांच्या नियुक्तीला आता एका आरोपीने दिले हायकोर्टाकडे आव्हान

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२४ । लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली असून मात्र यावर काँग्रेसने विरोध केला होता. अशामध्ये आता ॲड. उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला एका आरोपीने आव्हान दिले असून त्याने मुंबई हायकोर्टाकडे नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

उज्ज्वल निकम यांनी मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी त्यांचा १६,००० हून अधिक मतांनी पराभव केला. यांनतर सरकारने पुन्हा त्यांची सरकारी वकी ल म्ह्णून नियुक्ती केली आहे. मात्र यावर काँग्रेस आक्षेप घेतल्यानंतर आता अनेक हत्या प्रकरणांत आरोपी असलेला विजय पालांडेने सोमवारी ॲड. उज्ज्वल निकम यांच्या विशेष सरकारी वकील म्हणून केलेल्या नियुक्तीला कोर्टामध्ये आव्हान दिले आहे.

विजय पालांडेने केलेल्या याचिकेमध्ये उज्ज्वल निकम यांची वाईट हेतूने नियुक्ती करण्यात आली आहे, असे म्हटले आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांची ओळख, हेतू, विचार, अजेंडा बदलेला आहे. ते आता भाजपचे नेते आहेत, असे पालांडेने याचिकेत म्हटले आहे. ते आता राजकीय पक्षाच्या अजेंड्यासाठी काम करतील. भाजपची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी ते हाय-प्रोफाइल प्रकरणांतील कथित आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून कोणत्याही थराला जातील आणि ते आरोपीच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असेल., असे पालांडेने आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.