⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव | बंडखोरांच्या मतदारसंघात धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ, असा आहे नियोजित दौरा

जळगाव | बंडखोरांच्या मतदारसंघात धडाडणार आदित्य ठाकरेंची तोफ, असा आहे नियोजित दौरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । माजी मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे येत्या शनिवारी (दि. २०) जळगाव जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. पाचोरा, धरणगाव व पारोळा येथे त्यांचा संवाद कार्यक्रम होणार आहे. शिंदे गटात गेलेल्या जिल्ह्यातील पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघांत हा कार्यक्रम होणार आहे.

गेल्या आठवड्यात प्रकृती अस्वास्थामुळे आदित्य ठाकरे यांचा नियोजित दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. मात्र, आता पुन्हा दौऱ्याचे नियोजन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या पाच आमदारांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. या पाच आमदारांपैकी तीन आमदारांच्या मतदारसंघात ते संवाद साधणार आहेत.

असा आहे नियोजित दौरा
शनिवारी सकाळी १०.४० वाजता यांचे जळगाव विमानतळावर युवासेना ग्रामीणतर्फे तर त्यानंतर अजिंठा चौफुली येथे स्वागत होईल. इच्छादेवी चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डीमार्ट चौक, शिरसोली रस्त्याने पाचोरा येथे जाणार आहेत. आकाशवाणी चौकात शिवसेना व युवासेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. शिवसेनेतून आमदार किशोर पाटील यांच्या पाचोरा मतदारसंघात दुपारी १२ वाजता आदित्य शिवसंवाद साधणार आहेत. दुपारी १.४५ वाजता पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसंवाद साधतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता आमदार चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघातील पारोळा येथे ते शिवसंवाद साधणार आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.