⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | गुन्हे | ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्महत्या, घटनास्थळी आढळली सुसाईट नोट

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वैशाली ठक्करची आत्महत्या, घटनास्थळी आढळली सुसाईट नोट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ ऑक्टोबर २०२२ । टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने इंदौर येथे तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ‘ये रिश्ता क्या कहता है’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये संजनाची भूमिका साकारून तिने लोकप्रियता मिळवली. बिग बॉसमध्येही ती सहभागी झाली आहे. दरम्यान, वैशाली ठक्कर हिच्या आत्महत्येने हिंदी सिनेमासृष्टी हादरली आहे. आत्महत्येचे वृत्त मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास तेजाजी नगर पोलीस करत आहेत. Actress Vaishali Thakkar suicide

वैशाली ठक्कर ही गेल्या 1 वर्षापासून इंदूर येथे तिच्या घरी राहत होती. तिने आपल्या करिअरची सुरुवात अँकरिंगपासून केली. 2015 मध्ये, तिला स्टार प्लस शो ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये संजनाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या टेलिव्हिजन शोमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या शोनंतर ती ये वाद रहा, ये है आशिकी, ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, लाल इश्क आणि विष और अमृतमध्ये दिसली. वैशाली ही मूळची मध्य प्रदेशातील उज्जैनची आहे.

ससुराल सिमर का मधील अंजली भारद्वाज ही वैशालीची सर्वात लोकप्रिय भूमिका होती. ज्यासाठी तिला गोल्डन पेटल अवॉर्ड्समधील नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे. 2019 मध्ये, वैशाली टीव्ही शो मनमोहिनीमध्ये दिसली. ज्यामध्ये तीने मानसीची भूमिका साकारली आहे. वैशालीने टेलिव्हिजनशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे.

दरम्यान, वैशाली हिच्या आत्महत्येचे वृत्त समजताच तिचे चाहते दु:खी झाले असून त्यांच्या आत्महत्येमागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांना घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली आहे. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तपास तेजाजी नगर पोलीस करत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.