जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । मराठी सिनेअभिनेते प्रदीप पटवर्धन (Pradeep Patwardhan) यांचं वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या या निधनाच्या वृत्ताने मराठी मनोरंजन विश्वाला धक्का बसला आहे. तसेच त्यांचे चाहतेही शोकाकुल झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. Pradeep Patwardhan passed away
मराठी नाटकं, सिनेमे आणि मालिकांमध्येही प्रदीप पटवर्धन यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. प्रदीप पटवर्धन यांनी आपल्या अभिनयानं मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मराठी सिनेसृष्टीत मानानं आणि अभिमानानं मिरवावं असं व्यक्तीमत्व. त्याचं नाव सिनेसृष्टीत आदरानं घेतलं जातं.
प्रदीप पटवर्धन यांचे अनेक सिनेमे गाजले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नवरा माझा नवसाचा या सिनेमांनी तर लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मोरूची मावशी नाटक नाट्यरसिकांना खेचून तिकीटबारीवर खेचून आणलं. तर हास्य जत्रेतून त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं. अश्या अवलियाचं अकाली जाणं अनेकांसाठी धक्कादायक आहे.
प्रदीप पवर्धन यांचे गाजलेले सिनेमे
एक फुल चार हाफ, डान्सपार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट, पोलीस लाईन, 1234, एक शोध, थॅक्यू विठ्ठला, चिरनेर