जळगाव लाईव्ह न्यूज । २२ ऑक्टोबर २०२३ । जिल्ह्यात मागील काही दिवसापासून गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई कऱण्यात येत आहे. आता अशातच चाळीसगाव तालुकयातील एका महिलेवर बेकायदा गावठी दारू विक्री केल्याप्रकरणी एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. आक्काबाई सुरेश चव्हाण, (वय-४०) रा. सांगवी, ता. चाळीसगाव असं या महिलेचं नाव असून याबाबतचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी काढले.
दारूमुळे अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असून अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. यातच बेकायदेशीर दारूची विक्री करणार्यांवर पोलीस कारवाई करीत असताना देखील गुपित दारू विक्री सुरूच असते. अशातच बेकायदेशीर दारूची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई व्हावी या हेतूने पोलिसांनी
चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक हद्दीतील गावठी दारू विक्री करणार्यांविरुद्ध कंबर कसली आहे.
या अनुषंगाने, हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणार्या महिला नामे आक्काबाई सुरेश चव्हाण, (वय-४०) रा. सांगवी, ता. चाळीसगाव हिच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत ८ गुन्हे दाखल असून ३ वेळा प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती. त्यामुळे तिचे विरूध्द एम.पि.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्ध करणेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सादर करण्यात आला होता. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तिला स्थानबद्ध करणेबाबतचा आदेश नुकतेच पारित केले आहे. पोउपनि लोकेश पवार व पथक यांनी तिला ताब्यात घेऊन तिची रवानगी अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
दरम्यान महीले विरोधात करण्यात आलेली ही चाळीसगाव तालुक्यातील पहिली व जळगाव जिल्ह्यातील दुसरी कार्यवाही आहे. सदर कार्यवाहीमुळे गावठी हातभट्टीची दारू तयार व विक्री करणार्यांचे धाबे दणाणले असून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.