⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | बातम्या | जळगाव जिल्ह्यातील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई, पोलीस अधीक्षकांची माहिती

जळगाव जिल्ह्यातील तीन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई, पोलीस अधीक्षकांची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांवर एमपीडीए कारवायांचा सपाटा सुरूच असून अशातच आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आलीय. जळगाव एमआयडीसी, यावल आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिघांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी दिली.

आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर (वय-२४, रा. तुकाराम वाडी, जळगाव) आकाश मधुकर बिऱ्हाडे (वय-२२, रा. सिद्धार्थ नगर, यावल) व प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे (वय-२८, रा. पाडळसा ता. यावल) असे स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

जळगाव एमआयडीसी पो.स्टे. हद्दीतील आकाश ऊर्फ खंडया सुकलाल ठाकुर याच्यावर ७ गुन्हे दाखल आहेत. त्याचा एमपीडीए प्रस्ताव हा एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तयार करुन प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे दि.१९ ऑगस्ट रोजी सादर केला. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेकडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांनी नागपूर कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार एमआयडीसी पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि.जगदाळे, पोहेकॉ.दत्तात्रय बडगुजर, पोकॉ.योगेश बारी, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे अशांनी स्थानबध्द इसमास ताब्यात घेतले आहे. स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, नागपूर जि.नागपूर येथे दाखल करण्यात आले आहे.

यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मधुकर बिऱ्हाडे याच्यावर १० वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यावल पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकूर यांनी एमपीडीए प्रस्ताव तयार करुन प्रस्ताव हा स्था.गु.शा. जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकारी यांचेकडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार जळगाव जिल्हाधिकारी यांनी त्यास मुंबई कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. त्यानुसार यावल पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक प्रदिप ठाकुर, पोहेकों वासुदेव मराठे अशांनी स्थानबध्द इसमाला ताब्यात घेतले आहे. स्थानबध्द इसम यास मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.

फैजपूरच्या डॉनची मुंबई कारागृहात रवानगी
फैजपूर पो.स्टे.हद्दीतील स्थानबद्ध इसम प्रविण ऊर्फ डॉन गोपाळ तायडे याच्याविरुध्द भादंवि व दारुबंदी कायदया अंतर्गत १३ गुन्हे दाखल आहेत. त्यास जळगाव जिल्हाधिकारी यांनी मुंबई कारागृहात स्थानबध्द करण्याबाबत आदेश पारीत केला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.