जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२१ । गुजरातहुन चाळीसगावला गुटख्याची वाहतूक करणाऱ्या लक्झरीवर कारवाई करत १० लाख ८० हजार रूपयांचा गुटखा व १० लाखांचे वाहन असा सुमारे २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक शेख लतीफ शेख अन्वर (वय. २८), नदीम खान आसिफ खान (वय. २६, दोघे. रा. भडगाव, जि. जळगाव), विकास सहादू महाजन (वय. २८, रा. वरखेडी, ता. चाळीसगाव ) यांच्या विराेधात गुन्हा दाखल झाला.
याबाबत असं की, धुळे तालुक्यातील नेर गावाच्या शिवारातून जाणाऱ्या साई अर्पण लक्झरीतून ( जीजे-१९-एक्स-९९९३) गुटख्याची वाहतुक केली जात होती. ही लक्झरी पोलिसांनी अडवले. लक्झरीत २५ गोण्यांमध्ये प्रतिबंधित गुटखा तसेच तंबाखु होती. याबाबत विचारणा केल्यावर चालक व इतरांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. या कारवाईत १० लाख ८० हजार २०० रुपयांचा गुटखा व १० लाखांचे वाहन असा २० लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई सोमवारी पहाटे झाली.
यांनी केली कारवाई
पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपअधिक्षक प्रदीप मैराळे यांनी पथकाचे कौतुक केले आहे. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक सागर काळे, प्रवीण पाटील, धीरज सांगळे, कुणाल शिंगाणे, प्रमोद इशी, सुमित चव्हाण, ज्ञानेश्वर गिरासे यांच्या पथकाने ही कारवाई केली.