---Advertisement---
गुन्हे पारोळा

अपघातातील जखमी प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू

accident
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ नोव्हेंबर २०२१ । मालेगावहून एरंडोलकडे जाणारी इको कार पलटी होऊन अपघात झाल्याची घटना दि.७ रोजी पारोळ्याजवळ घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या खर्ची (ता.एरंडोल) येथील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

accident

एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील रहिवाशी मालू मराठे हे नातेवाईकांसोबत दि.७ रोजी कार (क्र.एम.एच.१९, सी.झेड.२५७३) ने मालेगाव येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असतांना कारचालक मनोहर दोधू माळी याने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालविली. यामुळे राष्टीय महामार्गावरील हॉटेल सहयोगजवळ कार कलंडली. या अपघातात भगवान लक्ष्मण जाधव (वय-४७) यांच्यासह नितीन पाटील, संतोष पाटील, मालू मराठे, स्वाती मराठे, विक्रम पाटील, दगडू मराठे हे गंभीर जखमी झाले होते.

---Advertisement---

यातील भगवान जाधव यांच्यावर एरंडोल येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मालू मराठे यांच्या फिर्यादीवरून कारचालक मनोहर माळी याच्याविरोधात पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---