---Advertisement---
एरंडोल गुन्हे

Accident : भरधाव आयशरच्या धडकेत तरुण ठार, एकुलता मुलगा गमावल्याने आक्रोश

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । नितीन ठक्कर । एरंडोल शहरालगत होणारे अपघात थांबतच नसून गेल्या महिन्याभरात तीन अपघात झाले आहेत. तालुक्यातील पिंपळकोठा येथे भरधाव आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. एकलता एक मुलगा गेल्याने कुटुंबियांनी मन हेलवणारा आक्रोश केला होता.

erandol accident

पिंपळकोठा येथील शिवम बापू हटकर (वय-२२) हा तरुण शुक्रवारी दुपारी दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीजे.१२०४ मध्ये पेट्रोल भरण्यासाठी पिंपळकोठा गावाहून जळगावकडे असलेल्या एका पेट्रोल पंपावर गेला होता. दुपारी ३.३० वाजता पेट्रोल भरून पुन्हा गावात परतत असताना पिंपळकोठा गावाजवळ भरधाव आयशर क्रमांक एमएच.४८.एवाय.४९५१ याने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत शुभम हटकर हा जागीच ठार झाला आहे. तर दुचाकीही चक्काचूर झाली आहे.

---Advertisement---

घटनेची माहिती कळताच पिंपळकोठा येथील ग्रामस्थांनी धाव घेऊन गर्दी केली होती. घटनेत शुभमची दुचाकी चक्काचूर झाली असून अलॉय व्हील देखील तुटलेले आहे. एरंडोल पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन थांबलेली वाहतूक सुरळीत केली आहे. कुटुंबातील एकुलता एक मुलगा गेल्याने नातवाईकांनी एकच आक्रोश केला होता. शेवटचे वृत्त हाती आले तोवर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---