जळगावहून इंदौरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात ; फैजपूर जवळील घटना

मे 25, 2025 9:50 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२५ । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसतात आहे. यातच जळगावहून इंदौरकडे जाणारी खासगी ट्रॅव्हल्स आमोदा ते फैजपूर दरम्यान वळणावर शेतात जावून कलंडली. ही घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पाऊस सुरू असतांना हा अपघात झाला.

jalgaon mahanagar palika 10 jpg webp

पावसामध्ये रस्त्यावरील वळणावर ओल्या झालेल्या साईडपट्टीवरून ट्रॅव्हल्स ब्रेक न लागल्याने वळण न घेता थेट केळीच्या बागेत जावून कलंडल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. दरम्यान, ट्रॅव्हल्समधील २५ ते ३० प्रवाशांपैकी दोघे जण किरकोळ जखमी झाले. याच वेळी पाऊस सुरू असल्याने रात्रीच्या अंधारात बचावकार्य करतांना अडचणी आल्या.

Advertisements

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरूळ आणि आमोद्यासह फैजपूर येथून लोक मदतीसाठी धावले. दररोज रात्री जळगाव ते इंदौर दरम्यान चालणारी शाईन ट्रॅव्हल्स क्रमांक (एमपी ०९-पी९०९०) रात्री ९.३० वाजता आमोदा ते पिंपरूड फाटा दरम्यान शेतात जावून कलंडली. या रस्त्यावरील छोट्या वळणावर ट्रॅव्हल्स साईडपट्टीवरून थेट शेजारच्या शेतात शिरली आणि अचानक ब्रेक लावल्याने एका झाडाजवळ जावून कलंडली. रात्री पाऊस सुरू असतांना अंधार होता. ट्रॅव्हल्सचे लाइटही बंद झाल्याने एकच गोंधळ उडाला

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment