---Advertisement---
गुन्हे धरणगाव

लोणे फाट्याजवळ अपघात, एक जण जागीच ठार, दोघे गंभीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२१ । धरणगाव जवळच असलेल्या लोणे फाट्याजवळ सोमवारी सकाळी सवारी जीप व मोटार सायकलचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

accident lone

अमळनेरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपने लोणे फाट्याजवळ मोटरसायकलला जबर धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. एकाला जास्त दुखापत झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मृत व्यक्ती व गंभीर जखमी झालेले दोघे वैजापूरजवळ असलेल्या मेलाणे ता.चोपडा येथील असून कंडारी येथे नातेवाईकांकडे आल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

---Advertisement---

घटनास्थळी अतिशय भयावह परिस्थिती पहावयास मिळाली असून जखमींना ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी कोणतेही वाहन थांबत नव्हते. एका ओमनी चालकाने माणुसकीच्या नात्याने २ जणांना आयशरमध्ये व एका व्यक्तीला स्वतःच्या गाडीतून ग्रामीण रुग्णालय धरणगाव येथे आणले. सुरवातीचे उपचार केल्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय जळगाव येथे हलविण्यात आले. या सर्व प्रकारात १०८ ला कॉल करून देखील गाडी जवळजवळ १ तास उशिरा आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

घटनास्थळी धरणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक शंकर शेळके, सहाय्यक निरीक्षक अमोल गुंजाळ व गवारे तसेच त्यांच्या टीमने स्पॉट पंचनामा केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---