जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । भरधाव एसटी बसने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना, शुक्रवारी सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास तळवेल फाट्याजवळ घडली.
अधिक माहिती अशी की, प्रल्हाद लक्ष्मण झोपे (वय ४२, रा. पिंपळगाव बुद्रूक) हे दुचाकीने (एम.एच.१९-ए.जी.३७८३) महामार्गावरील सर्व्हीस रोडने तळवेल गावाकडे येत होते. वाटेत मुक्ताईनगरकडून वरणगावकडे जाणाऱ्या बसने (एम.एच.२०-बी.एल.२४१४) दुचाकीला धडक दिली. या अपघातात झोपे हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर बसचालक बससह वरणगाव पोलिसांत हजर झाला. याप्रकरणी वरणगाव पोलिस स्टेशनला या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.