जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून येतेय. कृत्य करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. अशातच जळगावात तरुणीवर झालेल्या अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आलीय. कौटुंबीक संबंध असल्याचा गैरफायदा घेत एक जण जेवणाचा डबा घेण्यासाठी तरुणीच्या घरी आला. यावेळी चाकूचा धाक दाखवून तो तरुणीला त्याच्या घरी घेवून गेला. आणि तिच्यावर अत्याचार केला. या प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संशयित नराधमाविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे घटना?:
जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीच्या आईचे पंधरा दिवसापूर्वीच आजारपणामुळे निधन झाले आहे. तर वडील एका ठिकाणी कामाला असून ते १ सप्टेबरला वडिलांची रात्रपाळीची ड्युटी असल्याने ते कामावर गेले होते. यावेळी पीडित तरुणी एकटीच घरी होती. यादरम्यान, पीडित तरुणीच्या परिवारासोबत घरोब्याचे संबंध असलेला तरुण हा त्याची पत्नी गावाला गेलेली असल्याने त्याला पीडितेकडून जेवणाचा डबा मिळत होता.
त्यामुळे तो जेवणाचा डब्बा घेण्यासाठी पीडित तरुणीच्या घरी गेला असता यावेळी घरी एकटी असल्याचा फायदा घेत त्याने चाकूचा धाक दाखवून पीडितेला त्याच्या घरी घेऊन गेला. त्यानंतर त्याने पीडितेवर दोन वेळा अत्याचार केला. यावेळी तरुणीने विरोध केला त्याने तिच्या डाव्या हातावर चाकूने वार करून तिला जखमी केलं. तसेच घडलेल्या प्रकाराबाबत कुणाला सांगितलं तर जीवे मारण्याची धमकीही दिली.
घटनेने हादरलेल्या पीडित तरुणीने अखेर या प्रकरणी पाच दिवसानंतर शनिपेठ पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयित नराधमाविरुद्ध याच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश चव्हाण हे करीत आहेत.