जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । जळगाव शहरातील ३२ वर्षीय विवाहितेसोबत प्रेमसंबंध निर्माण करीत तिला एकाने लग्नाचे आमीष दाखविले होते. लग्नाचे आमीष दाखवीत २०१९ ते २०२२ दरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण करून विवाहितेवर जळगाव, धुळे, पुण्यात अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
जळगाव शहरातील एका ३२ वर्षीय विवाहितेसोबत निलेश दत्तात्रेय सोनजे रा.शिवकॉलनी याने प्रेमसंबंध निर्माण केले होते. विवाहितेला लग्नाचे आमीष दाखवून मे २०१९ ते सप्टेंबर २०२२ दरम्यान वेळोवेळी शारीरिक संबंध निर्माण केले. विवाहितेने नकार दिला असता मुले व परिवाराला मारण्याची धमकी देत शिवीगाळ व मारहाण केली.
महिलेच्या फिर्यादीवरून निलेश सोनजे याने लग्नाचे आमीष दाखवून जळगाव, धुळे, पुणे येथे अत्याचार केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रोहिदास गभाले करीत आहे.