जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडतच असून अशातच पाचोरा तालुक्यातून संतापजनक घटना समोर आलीय. मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा तालुक्यातील एका गावात २४ वर्षीय महिला ही आपल्या मुलगा व नातेवाईकांसह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावात राहणारा महेंद्र गोविंद गुजर याने महिलेला मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला.
तसेच याला प्रतिकार केला असता महिलेवर विळ्याने वार करून हाताला दुखापत केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महेंद्र गोविंद गुजर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे.