जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२४ । छायाचित्र एडिट करून समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित तरुणीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार मुक्ताईनगरमध्ये घडला. याप्रकरणी संशयितावर मुक्ताईनगर येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
तालुक्यातील एका गावातील रहिवासी २९ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. त्यानुसार आसिफ मुश्ताक खाटीक हा समोरील घरात वास्तव्यास असलेल्या तरुणीच्या नणंदेला बहिण मानत होता. यामुळे त्यांच्या घरात आसिफचे येणे-जाणे होते. या ओळखीचा गैरफायदा घेऊन त्याने त्या विवाहित महिलेचा मोबाइल क्रमांक घेऊन संपर्क वाढवला. नंतर काही छायाचित्र काढले. हे छायाचित्र एडिट करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी या महिलेस देत १७ एप्रिल आणि २८ एप्रिल रोजी शारीरिक अत्याचार केले.
यानंतर त्याने पुन्हा या महिलेस धमकी दिली. ३ मे २०२४ रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास आसिफने पीडित महिलेच्या घरी जावून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी विवाहितेचे कुटुंबीय जागे झाल्याने त्याने पलायन केले. कुटुंबीयांनी महिलेस विश्वासात घेऊन विचारपूस केली. यानंतर आसिफ मुश्ताक खाटीक याच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे