जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह मुलींना लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वारंवार समोर येत आहे. अशीच एक घटना अमळनेर तालुक्यातून समोर आलीय. जिथे 28 वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचा एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजेच महिलेच्या पहिल्या पतीशी घटस्फोट घडवून आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्याचे आरोप आहेत. त्यानंतर ती गर्भवती झाली, परंतु संशयित आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे.

महिला आपल्या कुटुंबासह अमळनेर तालुक्यातील एका गावात राहत होती. ती विवाहित असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आहे. सन 2021 मध्ये तिची ओळख एकनाथ छबीलाल पाटील (रा. सोनवद, ता. धरणगाव) याच्याशी झाली. ओळखीनंतर त्यांचे नाते प्रेमसंबंधात रूपांतरित झाले. एकनाथने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या मुलीचे संभाळण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महिलेने आपल्या पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला आणि एकनाथसोबत पुण्यात पाच महिने पती-पत्नीसारखे राहू लागली.
अत्याचार आणि गर्भवती
या काळात महिलेवर वेळोवेळी शारीरिक अत्याचार करण्यात आले आणि ती गर्भवती झाली. परंतु, नंतर एकनाथने महिलेसोबत लग्न करण्यास नकार दिला आणि मुलगी संभाळण्याची जबाबदारीही स्वीकारली नाही. यामुळे महिलेला आपल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने 11 फेब्रुवारी रोजी रात्री 1 वाजता मारवड पोलीस ठाण्यात तक्रार केली.
या तक्रारीनुसार आरोपी एकनाथ छबीलाल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील चौकशी डीवायएसपी आण्णासाहेब घोलप यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.