---Advertisement---
जळगाव जिल्हा

शरद पवार गटाच्या कार्यक्रम, बैठकांपासून नाथाभाऊ दूर; कार्यकर्ते संभ्रमात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । 10 मार्च 2024 । देशासह महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. राज्यातील महायुतीसह महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाहीय. अद्यापही उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाहीय. त्यामुळे कोणाला तिकीट मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

khadse jpg webp

मात्र यातच गेल्या अनेक दिवसांपासून शरद पवार गटाचे नेते तथा आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरू असून अद्यापपर्यंत एकनाथ खडसे व त्यांच्या परिवाराकडून याबाबत इन्कार केला जात आहे; मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठका, कार्यक्रमांपासून खडसे दूर राहत आहेत.राष्ट्रवादी शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे चिन्ह मिळाल्यानंतर, या चिन्हाचे अनावरण रायगडावर करण्यात आले; मात्र या कार्यक्रमात पक्षाच्या राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा अॅड. रोहिणी खडसेंसह पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दूर राहिले.

---Advertisement---

महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सुरू असलेल्या २ बैठकांनाही अॅड. रोहिणी खडसे, एकनाथ खडसे हजेरी लावत नाहीत. पक्षाच्या बैठकांपासून सध्या खडसे दूर आहेत. यामुळे चर्चाना मात्र दुजोरा मिळत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होते. अशातच आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशासह लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतच्या घोषणेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. त्यात खडसे यांना मानणारे कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमात आहेत.

प्रकृतीच्या कारणास्तव खडसे सध्या अलिप्त असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे भाजप प्रवेशाच्या चर्चाना भाजप नेत्यांकडूनही दुजोरा दिला जात आहे. यामुळे आता काय घडामोडी घडतील, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---