जळगाव लाईव्ह न्यूज । २६ एप्रिल २०२२। येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व (पेट) परीक्षेच्या शेवटच्या दिवशी ६४५ विद्यार्थ्यांपैकी ३९६ विद्यार्थ्यांनी पेटची ऑनलाइन परीक्षा दिली. पाच दिवसांत एकूण २३१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १२७६ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती.
१८ ते २२ एप्रिलपर्यंत विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा केंद्रात या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. परीक्षेसाठी ३ हजार ६८८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. शेवटच्या दिवशी चार बॅचेससाठी ६४५ विद्यार्थ्यांची नोंदणी होती. त्यापैकी ३९६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. पाच दिवसात २३१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर १३७६ अनुपस्थित राहिले. केंद्रप्रमुख म्हणून प्रा. पी. पी. माहुलीकर यांनी यांनी तर मुख्य समन्वयक प्रा. समीर नारखेडे, समन्वयक डॉ. मनोज पाटील, प्रशासकीय अधिकारी म्हणून उपकुलसचिव व्ही.व्ही. तळेले, तांत्रिक अधिकारी म्हणून दाऊदी हुसेन यांनी काम पाहिले.