---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

शरद पवारांना सोडण्यासाठी मला… एकनाथ खडसेंचा खळबळजनक दावा, काय आहे वाचा

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । एकनाथ खडसेंनी (भाजपात येण्यासाठी हात-पाय जोडू नये, त्यांनी शरद पवारांना घट्ट पकडून राहावं, असं विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केलं होतं. त्यामुळे खडसे यावर काय बोलतात याकडे लक्ष लागले होते. यातच एकनाथ खडसेंनी एक खळबळजनक दावा केला असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

eknath khadse sharad pawar jpg webp

नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे?
गिरीश महाजनांच्या विधानावर पलटवार करताना खडसे म्हणाले की, आपण भाजपकडे येण्याचा प्रयत्नच करत नसून उलट भाजपकडूनच आपल्याला बोलावणं आहे. शरद पवार यांना सोडण्यासाठी अजितदादा गटाच्या दोन बड्या नेत्यांनीही आपल्याला फोन केले होते, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला आहे.

---Advertisement---

खडसेंनी जळगावात पत्रकारांशी बोलताना हा दावा केला आहे. मी शरद पवारांचा पक्का शिलेदार असल्यामुळे अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही. मला अजित पवारांनी त्यांच्यासोबत जाण्याबाबत विचारलं होतं. तसेच शरद पवार यांना सोडून अजितदादा गटात येण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांचाही मला फोन आला होता, असा गौप्यस्फोट करतानाच मला या दोन्ही नेत्यांनी बोलावलं होतं. पण मी शरद पवार यांचा पक्का शिलेदार आहे. कोणत्याही परिस्थिती शरद पवार यांची साथ सोडणार नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.

मी सत्तेसाठी कोणाचाही हांजीहांजी करणारा माणूस नाही. मी कोणाच्याही मागे उभा राहून फोटो काढणारा माणूस नाही. मीच संकट मोचक आहे असं सांगून पुढे पुढे करणारा माणूस मी नाही. स्वाभिमानाने जगलो. स्वाभिमानाने जगेल. सत्तेत जायचं असलं तर कधीच गेलो असतो, असं म्हणत नाथाभाऊंनी गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता टीका केली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---