⁠ 
सोमवार, जानेवारी 6, 2025
Home | गुन्हे | दुर्दैवी ! जळगावच्या तरुणाला बाथरूममध्ये मृत्यूने गाठले, नेमकं काय घडलं

दुर्दैवी ! जळगावच्या तरुणाला बाथरूममध्ये मृत्यूने गाठले, नेमकं काय घडलं

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२३ । एका ३७ वर्षीय तरुणाचा अंघोळ करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने बाथरूममध्येच मृत्यू झाला ही घटना जळगाव शहारातील कांचननगर परिसरात घडली. नीलेश कमलाकर सोनवणे असं मयत तरुणाचे नाव असून याबाबत या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

कांचननगरात राहणारे नीलेश सोनवणे हा तरुण शहरातील सुरेश कलेक्शन या दुकानात प्रमुख सेल्समन म्हणून गेल्या १५ ते १६ वर्षांपासून कामाला होता काल शनिवारी सकाळी घरी अंघोळ करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने ते बाथरूममध्ये खाली पडले. त्यांना जीएमसी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांकडे सोपवला.

नीलेश यांच्या पश्चात आई, पत्नी, १० वर्षाची मुलगी सायली व ७ वर्ष वयाचा मुलगा ओम असा परिवार आहे. नीलेश यांचे वडील लहानपणीच वारल्याने ते अगदी कमी वयातच अगोदर नवजीवन कलेक्शन व त्यानंतर सुरेश कलेक्शन या दुकानात १५ ते १६ वर्षांपासून सेल्समन म्हणून कामाला होते. याच ठिकाणी त्यांचा लहान भाऊ सोमनाथ हा देखील सेल्समन म्हणून कामाला आहे. वडील वारल्यानंतर घरात कर्ता बनलेले नीलेश हे कुटुंबांचा गाडा ओढत होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.