आत्याच्या घरी जातो सांगून घरातून निघाला, पण वाटेतच मृत्यूला कवटाळले

मे 18, 2023 1:30 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२३ । जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथील २३ वर्षीय तरुणाने पळसखेडा शिवारातील शेतात विजेच्या खांबाला वायरचा गळफास करून आत्महत्या केल्याची घटना समोर आलीय. अक्षय संतोष सोनवणे असं मृत तरुणाचं नाव असून याबाबत सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

pahur kasbe jpg webp webp

अक्षय संतोष सोनवणे हा तरुण पळसखेडा (छत्रपती संभाजीनगर) येथील आत्या चंदाबाई क्षीरसागर यांच्याकडे मजुरी करण्यासाठी राहत होता. अधून-मधून तो गावी पहूरला यायचा. दरम्‍यान बुधवारी (१७ मे) सकाळी साडेसहाला मजूरीवर न जाता तो पहूरला गावी जातो; असे सांगून आत्याच्या घरून निघाला. मात्र तो पहूरला पोहोचलाच नाही. वाटेतच पळसखेडा शिवारातील संतोष बोऱ्हाडे यांच्या शेतात विजेच्या खांबाला वायरचा गळफास करून त्याने मृत्यूला कवटाळले.

Advertisements

आत्महत्येचा पाचवा प्रयत्न
अक्षयने या अगोदरही चार वेळा स्वतःला संपविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कधी भावाने तर कधी शेजारच्यांनी त्याला यातून बाहेर काढले होते. आज मात्र त्‍याने आत्‍महत्‍येचा केलेला प्रयत्‍न अखेरचा ठरला. अक्षयच्या अकाली जाण्याने विधवा आईवर दुःखाचा डोंगरच कोसळला. सोयगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निलेश लोखंडे करीत आहेत.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now