जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात मामाकडे राहणाऱ्या तरुणाने २३ वर्षीय तरुणाने गिरणा नदीवरील बांभोरी पुलावरून उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. शुभम सतीश चौधरी (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट असून याबाबत तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मेहरूण परिसरातील रेणुकानगरात मामाच्या घरी राहणाऱ्या शुभम सतीश चौधरी या तरुणाने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाच्या कठड्यावर चढून स्वतःला गिरणा नदीत झोकून दिले. घटना पाहणाऱ्या वाहनचालकांनी बांभोरी गावात याची माहिती दिली. ग्रामस्थ व पोहणाऱ्यांनी त्याला बाहेर काढले. मात्र त्या अगोदर नदीत पाणी सोडलेले असल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
त्याला मृतावस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, शुभमच्या आईचे निधन झाले असून वडील मुंबई येथे कामाला आहेत. तो मामाकडे राहून काम धंदा करीत होता. त्याने आत्महत्या कशामुळे केली हे कारण अद्याप समोर आलेले नाही. तपास हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.