जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । जळगाव तालुक्यातील भादली-कानसवाडा रस्त्यावर असलेल्या पाटचारीवर आज सोमवारी सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सौरभ चौधरी असे त्याचे नाव असल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळावरील मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरु केलीय.
याबाबत असे की, भादली शिवारातील भादली-कानसवाडा रस्त्यावर असलेल्या पाटचारीवर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत भादली येथील पोलीस पाटील राधीका ढाके यांनी नशिराबाद पोलीसांनी माहिती दिली. त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी घेतली आहे. अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून चौकशीला सुरूवात केली आहे.
दरम्यान, घटनास्थळावरील मृतदेहाची अवस्था लक्षात घेता घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून मयत व्यक्ती हे जळगावातील दशरथ नगरातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.