---Advertisement---
यावल

वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळ घटना ! महिलेने दिला तब्बल 26 बोटांच्या बाळाला जन्म

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२३ । वैद्यकशास्त्रात नवनव्या आणि काही वेळेस अतिशय दुर्मिळ अशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. अशातच यावल तालुक्यातील न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात मध्य वैद्यकीय इतिहासातील एक दुर्मिळ घटना समोर आलीय. ती म्हणजे येथे मध्य प्रदेशातील झिरन्या येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय महिलेने तब्बल २६ बोटांच्या बाळाला जन्म दिला. ज्योती बारेला (वय २० रा, झिरन्या जि. खरगोन, मध्यप्रदेश) असं या दुर्मिळ बाळाला जन्म देणाऱ्या मातेचे नाव आहे. दरम्यान, या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

nhavi jpg webp webp

झिरन्या येथील ज्योती बारेला हिला प्रसूतीसाठी न्हावी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने गरोदर मातेची वैद्यकीय तपासणी केली व परिश्रम घेऊन ज्योती बारेला हिची पहाटे यशस्वी प्रसूती केली.

---Advertisement---

मात्र, ज्या बाळाचा जन्म झाला होता, ते पाहून डॉक्टर तसेच रुग्णालयातील कर्मचारी, तसेच बाळाचे नातेवाईक यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या बाळाला पाहून उपस्थित सर्वच अवाक् झाले.सर्वांनी आश्चर्य व्यक्त करण्यामागचं कारणंही मोठं होतं. सामान्यतः हातापायाचे मिळून २० बोटे असतात. जे बाळ जन्माला आले त्याच्या हातापायाला तब्बल २६ बोटे आहेत. या नवजात बालकाच्या दोन्ही हाताला प्रत्येकी सहा बोटे आणि दोन्ही पायाला प्रत्येकी सात बोटे असे एकूण २६ बोटे या बाळाला आहे.

तब्बल २६ बोटांचे बाळ जन्माला येणे ही वैद्यकीय इतिहासातील अतिशय दुर्मिळ घटना आहे, असे मत ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. कौस्तुभ तळले व सावदा येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. राजेश चौधरी यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---