⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

खान्देशात आढळला लाल चोचीचा कॅस्पियन टर्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । येथील वाघूर धरणावर निरीक्षण करताना कॅस्पियन टर्न (लाल चोचीचा सुरय) हा पक्षी आढळून आला असून या पक्षाची फोटोसह नोंद वन्यजीव संरक्षण संस्थेचे पक्षी अभ्यासक राहुल सोनवणे, प्रसाद सोनवणे यांनी घेतली आहे.

मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक, अमन गुजर, योगेश गालफाडे, सतीश कांबळे, नीलेश ढाके, जगदीश बैरागी, ऋषी राजपूत, अरुण सपकाळे, वासुदेव वाढे, राजेश सोनवणे यांनी यावेळी सहभाग नोंदवला. लाल चोचीचा सुरय हा पक्ष्यांपैकी सर्वात माेठा सुरय आहे. त्याचा आकार ४७ ते ५४ सेंटिमीटर असतो. त्याचा रंग पांढरा असून पाय व डोके काळे असतात. चोच माेठी, जाड असून, लाल रंगाची असते. म्हणून त्याला लाल चोचीचा सुरय असेही म्हणतात.

हा पक्षी गुजरात व दक्षिण भागातील समुद्री किनारे, खाडीत हिवाळी स्थलांतर करतो. आपल्या भागातील याची ही नोंद त्याच्या हिवाळी अधिवासाकडून त्याच्या प्रजनन स्थळाकडील मार्गाकडे होणाऱ्या प्रवासाच्या दरम्यानचा एक थांबा अशी म्हणता येईल.
जोडी किंवा छाेट्या थव्यात आढळणारा हा पक्षी वाघूर धरण परिसरात एकट्याने दिसून आला. त्याच्या मूळ स्थानाकडे परत जाताना तो कोणत्या मार्गाने जातो यावर जिल्ह्यातील पक्षी अभ्यासकांना अभ्यास करता येणार आहे.