⁠ 
मंगळवार, डिसेंबर 3, 2024
Home | गुन्हे | बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या ५० वर्षीय नराधमाला न्यायालयाचा दणका ; सुनावली पाच वर्षांची शिक्षा

बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या ५० वर्षीय नराधमाला न्यायालयाचा दणका ; सुनावली पाच वर्षांची शिक्षा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२३ । अमळनेरच्या न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणार्‍या आरोपीला ऍट्रॉसिटीच्या कलमांतर्गत ५ वर्षे शिक्षा आणि ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

यात पिडीतेसह पंच, पिडीतेची आजी आणि दुकानदार तसेच तपासी अधिकारी रफीक शेख यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. यामुळे न्यायाधिशांनी शिक्षा सुनावली.

काय आहे प्रकरण?
पारोळा तालुक्यातील देवगाव येथील रहिवासी संतोष मुरलीधर पाटील ( वय ५०) या आरोपीने त्याच्या शेजारी राहत असलेल्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला होता. हि घटना दिनांक २ ऑगस्ट २०१८ सालची आहे. या मुलीस त्याने १० रूपये देऊन कुरकुरे आणण्यासाठी पाठविले. यानंतर त्याने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. याप्रसंगी ती बालीका त्याच्या हाताला चावा घेऊन पळून गेली. यानंतर तिच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पारोळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हा खटला अमळनेर न्यायालयात चालला. जिल्हा न्यायाधिश एस. बी. गायधनी यांच्या न्यायालयात खटला चालला. यात विशेष सरकारी वकील किशोर मंगरूळकर यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले. यात पिडीतेसह पंच, पिडीतेची आजी आणि दुकानदार तसेच तपासी अधिकारी रफीक शेख यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. यामुळे न्यायाधिशांनी कलम आरोपीला ऍट्रॉसिटीच्या कलमांतर्गत ५ वर्षे शिक्षा आणि ५०० रूपये दंड अशा शिक्षा सुनावल्या. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून उदयसिंग साळुंखे, पो. कॉ. हिरालाल पाटील, निती कापडणे, राहूल रणधीर यांनी काम पाहिले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.