जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून येतेय. अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. अशातच जळगाव जळगाव जिल्हा अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे. 14 वर्षीय मुलीवर 40 वर्षाच्या प्रौढाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे समोर आलीय. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकी घटना?
रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे १७ रोजी संशयित आरोपी नितीन मधुकर पाटील वय 40 व सहकारी महिला (वय30) यांनी संगनमत करून अल्पवयीन मुलीस काड्यावेचण्याच्या उद्देशाने नितीन पाटील याच्या ऐनपुर शिवारातील शेतात नेले. यावेळी संशयित आरोपी नितीन पाटील याने अल्पवयीन मुलीला अश्लील बोलून जबरदस्तीने अत्याचार केला.
या प्रकरणी निंभोरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोघ आरोपी विरुद्ध भाग 5 गु.र.नं. 170/22 भादवी कलम 376 , तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार कायदा अधिनियम कलम 4,6 तसेच अनु. जाती जमाती कायद्यानव्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे व निंभोरा पोलीस स्टेशन चे स.पो.नी गणेश धुमाळ व पोलीस तपास करीत आहेत.