⁠ 
गुरूवार, जानेवारी 9, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेर हादरले ! दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित मुलीने दिला बाळाला जन्म

अमळनेर हादरले ! दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित मुलीने दिला बाळाला जन्म

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२२ । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाचे दिसून येतेय. अशातच अमळनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने मुलगी गर्भवती राहिली आणि या प्रकारातून मुलीने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी तालुक्यातील निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी याच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीने स्वतः फिर्याद दिली आहे. निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी या तरुणाने २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी ९ वी ला असतांना तू मला आवडते. आपण लग्न करू दोघे पळून जाऊन असे सांगत होता. त्यावेळी मुलीने नकार देऊन मला शिकायचे आहे असे सांगितले. त्यावर त्या तरुणाने तू माझ्याशी प्रेमसंबंध कर अन्यथा तुझ्या आई वडिलांना मारून टाकेल, अशी धमकी देत होता.

घाबरून मुलीने हो म्हटल्यावर समाधान याने पीडित मुलीचे आईवडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता. हे प्रेमसंबंध मुलीच्या आईवडिलांना समजल्यावर त्यांनी मुलीचा साखरपुडा २६ जुलै २०२२ रोजी समाधान चव्हाण याच्याशी करून दिला. ती १८ वर्षाची असताना लग्न करण्यात येणार होते. ९ नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात तपासणीला आणले. डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगून अवघ्या सात महिन्याची गर्भवती असताना तिची प्रसूती केली.

तिने एक पुरूष जातीचे बाळास जन्म दिला आहे. पीडित तरुणीने जन्माला आलेले बाळ जवळ ठेवायचे नसल्याने बाळाचा परित्याग करून समितीच्या अश्विनी देसले यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध भाग ५ सीसीटीएनए स गुरनं. ११२/२ ०२२ भादवि कलम ३७६ (२N), ५०६ अपराधांपासु न संरक्षण अधि, २०१२ कलम ४,८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जयेश खलाणे, मारवड पो स्टे हे करित आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.