धक्कादायक ! 16 वर्षीय मुलाने केलं अल्पवयीन मुलीशी पळून विवाह; मुलीने दिला बाळाला जन्म

डिसेंबर 31, 2022 3:00 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२ । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते. अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. यामुळे महिलांसह मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतोय. मात्र अशातच भडगाव तालुक्यातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

crime rape jpg webp webp

नेमकी काय आहे घटना?
भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाने १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी पळून जावून लग्न केले. एवढेच नव्हेत तर अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिला. याप्रकरणी अल्पवयीन मुलावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

भडगाव तालुक्यातील एका गावात राहणारा १६ वर्षीय मुलाने पुणे जिल्ह्यातील एका गावात राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेत एका मंदीरात जावून लग्न केले. मुलगी ही अल्पवयीन असतांना तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून अल्पवयीन मुलीने मुलाला जन्म दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisements

यासंदर्भात भडगाव पोलीस ठाण्यात पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now