---Advertisement---
गुन्हे पाचोरा

Pachora : रेल्वे रुळ ओलांडणं जीवावर बेतलं; महिलेसह पुरुषाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२३ । रेल्वे रूळ ओलांडणे दोन जणांच्या जीवावर बेतले आहे. रेल्वे रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेखाली सापडून एका महिलेसह पुरुषाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील दुसखेडा येथे घडलीय. रत्नाबाई माधव पाटील (वय ५९) व अशोक झेंडू पाटील (वय ६०) असे मृतांचे नाव आहे.

duskheda news

नेमकी घटना काय?
पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रसादासाठी दुसखेडा येथील काही ग्रामस्थ व महिला भाविक रेल्वेमार्गाजवळून जात होते. दरम्यान दुसखेडा गावाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रत्नाबाई पाटील आणि अशोक पाटील यांना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

---Advertisement---

प्रसादासाठी सोबत जात असताना दोघांच्या मृत्यूने सोबत जात असलेल्या नागरिकांना धक्का बसला. घटना गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतातील अशोक पाटील हे मूळचे पहाण (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून, कुरंगी शिवारातील शेती करण्यासाठी दोन वर्षांपासून ते दुसखेडा येथे वास्तव्यास होते. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---