⁠ 
सोमवार, ऑक्टोबर 14, 2024
Home | महाराष्ट्र | हवामान खात्याची परतीच्या पावसाबाबत मोठी अपडेट ; 24 तासांत येथे मुसळधार पाऊस कोसळणार

हवामान खात्याची परतीच्या पावसाबाबत मोठी अपडेट ; 24 तासांत येथे मुसळधार पाऊस कोसळणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । देशातील बहुतांश राज्यासह महाराष्ट्रातून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. यामुळे देशातील वातावरणात बदल झाला असून काही ठिकाणी ऑक्टोबर हिटचा तडाखा बसत आहे. तर काही भागात थंडीची चाहूल पडत आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत मोठी अपडेट दिली असून येत्या २४ तासांत अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोळणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, केरळमध्ये १३ ऑक्टोबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय कर्नाटक, तामिळनाडूमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होईल. तसेच कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्रातही येत्या २४ तासांत पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

स्कायमेट हवामान अहवालानुसार, तमिळनाडू, उत्तर केरळ, दक्षिणी कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे आणि लक्षद्वीपमध्ये एक किंवा दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. रायलसीमा, मणिपूर आणि मिझोरममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून देखील मान्सूनने काढता पाय घेतला आहे. ठाणे, मुंबईसह उपनगरातही मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळे या भागात उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली असून अनेक भागातील तापमान वाढलं आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उन्हाच्या झळा अधिकच तीव्र होतील, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.