⁠ 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
Home | बातम्या | धक्कादायक! जळगावात हॉटेल व्यावसायिकाची बदनामी करणारे पत्रक वाटले..

धक्कादायक! जळगावात हॉटेल व्यावसायिकाची बदनामी करणारे पत्रक वाटले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२४ । जळगाव शहरात एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाच्या नावाने समाज माध्यमात आणि पत्रके छापून बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एमआयडीसी येथे असलेल्या हॉटेल फॉर सीजन रिक्रिएशनचे मालक महेश पूरनमल प्यारप्यानी यांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची बदनामी व्हावी या उद्देशाने काही लोकांनी पोस्ट आणि पत्रके व्हायरल केली आहे. कोणताही वाद किंवा चुकीचा प्रकार नसताना हे उद्योग करण्यात आले आहेत.

जळगाव शहरातील सिंधी समाजाच्या लोकांच्या मोबाईलवर ग्रुप कोणीतरी अज्ञात इसमाने दि.६ रोजी एमआयडीसी जळगाव येथे असलेल्या हॉटेल फॉर सीजन क्रिएशनच्या बाबतीत तसेच हॉटेल फॉर सीजनचे मालक महेश पूरनमल प्यारप्यानी यांची व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची बदनामी व्हावी अशा प्रकारचे खोटे व लबाडी प्रकाराच्या बदनामी कारक मजकूर असलेले मेसेज व तशीच पत्रके जळगाव शहरांमध्ये असलेल्या सिंधी समाजाच्या इसमांच्या दुकानांमध्ये टाकले होते.

महेश प्यारप्यानी यांना याबाबत माहिती मिळाल्यावर व सदर पत्रके वाचून त्यात त्यांची बदनामी होत असल्याची त्यांची खात्री झाल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे. पोलीस लवकरच आरोपीला शोधतील असा मला विश्वास असल्याचे हॉटेल फॉर सीजन रिक्रिएशन मालक महेश प्यारपानी यांनी सांगितले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.