जळगाव लाईव्ह न्यूज । 25 फेब्रुवारी 2024 । भुसावळ शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या डेली मार्केट परिसरात असलेल्या फळांच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी फळ व्यापारांचे मात्र लाखोंचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील डेली मार्केट हा परिसर फळाच्या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी फळांची साठवून करणारे १० ते १५ दुकाने आहेत. दरम्यान रविवारी २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजता फळांच्या गोडावूनला अचानक आग लागली. ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान या आगीमुळे गोडावूनजवळील इतर फळांची साठवणूक केलेले ९ दुकाने जळून खाक झाले आहे.
अग्नीशमन विभागाच्या बंबाच्या मदतीने ही आग विझविण्यात आली आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवत हानी झाली नसली तरी व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात आगीबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.