जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । चाळीसगावच्या शेतकऱ्याला शिरसोली येथील १२ जणांनी ३ लाख ६० हजार रुपयात गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एमआयडीसीपोलिसांत १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव कृष्णनगर तांडा येथे जगदीश किसन खरात (वय ३७) हे आपल्या राहतात. ते ऊस तोडणीच्या कामाचा ठेका घेतात. शिरसोली येथील अर्जून भिमा जाधव याला मजूरासाठी प्रत्येक ३० हजार आणि कमिशन ३० हजार असे एकुण ३ लाख ६० हजार रूपये जगदीश खरात यांनी दिली. परंतू अर्जुन जाधव यांनी ऊसतोडणीला मजूर पाठविले नाही.
दरम्यान खरात यांनी दिलेले पैसे मागितले असता अर्जून जाधव यांच्यासह इतर १२ जणांनी जगदीश किसन खरात यांना धमकी देत पैसे देणार नाही, कामावर येणार नाही असे सांगत जीवेठार मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी जगदीश खरात यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अर्जुन भिमा जाधव, अशोक जयसिंग भिल, रोहिदास शिवाजी भिल, गोकुळ शिवाजी भिल्ल, शिवाजी भाटू भिल्ल, राहूल अशोक भिल्ल, सुनिल महारू भिल्ल, करण उत्तम जाधव, सुकदेव सुनिल मालचे, राजू मानसिंग भिल्ल, राजेंद्र विठ्ठल मोरे आणि अनिल सुकलाल भिल्ल रा. शिरसोली ता. जि. जळगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.