⁠ 
सोमवार, मे 27, 2024

धावत्या रेल्वेसमोर येवून दिव्यांग तरुणाने संपविले जीवन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२४ । जळगाव तालुक्यातील वडनगरी येथील दिव्यांग युवकाने रेल्वेसमोर येवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास शहरातील समृध्दी अपार्टमेंट समोर घडली आहे.भगवान माणिलाल चौधरी (वय २६) असं मयत तरुणाच नाव असून आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे.

भगवान चौधरी हा आपल्या आईवडील आणि भाऊ सोबत वडनगरी येथे वास्तव्याला असून तो दोन्ही पायांनी अपंग होता. टेन्ट हाऊस चालवून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, शनिवारी ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता तो कामानिमित्ता जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. रविवारी ७ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता शहरातील समृध्दी अपार्टमेंटसमोरील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वे समोर उभा राहून आत्महत्या केली.

आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. सोबत असलेल्या कागदपत्राच्या आधारे त्यांची ओळख पटली. शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई निर्जला, वडील माणिलाल गंभीर चौधरी आणि लहान भाऊ पवन असा परिवार आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद सोनार हे करीत आहे.