अपंग पतीला शेतात नेऊन विहिरीत ढकललं ; पत्नीच्या कृत्याने धरणगाव हादरले
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२४ । धरणगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका अपंग असलेल्या पतीला विहिरीत ढकलून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६ वर्ष रा. भवरखेडा ता. धरणगाव) असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून या खुनाची कबुली पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी हिने दिला आहे. त्यानुसार पत्नीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश सुर्यवंशी हा तरुण आपल्या पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी यांच्यासोबत वास्तव्याला होता. २ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान, संशयित आरोपी पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी हिने पती प्रकाश सुर्यवंशी यांना तिच्या मार्गातील अडथळा दुर करण्याच्या उद्देशाने पतीला सोबत घेऊन गोविंदा शालिक पाटील यांच्या शेतातील मुंजोबाचे मंदिरात पाया पडण्याच्या बहाण्याने शेतात गेली.
नंतर पतीचा अपंगत्वाचा फायदा घेवुन त्याला विहिरीत ढकलुन देवून मारुन टाकले. दरम्यान हा धक्कादायक प्रकार बुधवार 12 जून रोजी रात्री नऊ वाजता समोर आला. याप्रकरणी धरणगाव पोलिसात संशयित आरोपी ज्योती सुर्यवंशीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले हे करीत आहेत.