जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑक्टोबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात मागील गेल्या काही दिवसापासून गंभीर गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जात आहे. अशातच आणखी एकावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्याला येरवडा येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) असे या गुन्हेगाराचे नाव असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले आहे.
नेमकं प्रकरण काय?
शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान याच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे ६ गुन्हे दाखल असण्यासह त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी त्याच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे पाठविला. तो प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांना पाठविण्यात आला व त्यांनी एमपीडीए कारवाईची मंजुरी देऊन तो जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. त्यानुसार त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. आदेशानुसार शहजाद खान याची येरवडा, पुणे कारागृहात रवानगी करण्यात आली.
प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, ईश्वर पाटील यांनी कारवाई केली.