⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

द्रौपदी नगरात बंद घर फोडले

जळगाव लाईव्ह न्यूज। २२ एप्रिल २०२२ । येथील द्रौपदी नगरातील बंद घर चोरटयांनी लक्ष करीत घरातील कपटातून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ६८ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना नुकतीच उघडकीला आली आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार , शहरातील दौप्रदी नगरातील रहिवासी भगवान भोमा पाटील हे त्यांच्या सासूचा हात फ्रॅक्चर झाल्याने त्यांना पाहण्यासाठी दि.२० एप्रिल रोजी रात्री घराला कुलूप लावून ते पत्नी व मुलाला घेऊन अयोध्यानगरात गेले होते. दि २१ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता घरी परतल्या नंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप व कडीकोयंडा तुटलेला आढळून आला. घरातील तसेच कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. त्यांनी घरातील कपाटातील साहित्याची पाहणी केली असता कपाटात ठेवलेले दागिने व रोकड लांबविल्याचे त्यांना लक्षात आले.

चोरी झाल्याची खात्री होताच पाटील यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली. सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार, उपनिरीक्षक गणेश देशमुख, योगेश साबळे, समाधान पाटील, सलीम तडवी व विकास पहूरकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. भगवान पाटील यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यान विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.