जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात दुचाकीने एका सात वर्षीय बालकाला उडिवले. सार्थक कपिल बागडे असं या बालकाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.संतप्त नागरिकांनी दुचाकीस्वाराचा शोध घेतला, मात्र तो वेगात निघून गेला होता.

याबाबत असे की, शहरातील पांडे चौक ते सिंधी कॉलनीदरम्यान वाहने सतत जलदगतीने जात असतात. या मार्गावर कंजरवाडा हे परिसर असून या भागात रस्त्यावर नेहमी अपघात होत असतात. सदर परिसर गजबजलेला असतो. दरम्यान रविवारी रात्री कंजरवाडा येथील सार्थक बागडे याला अज्ञात दुचाकीस्वाराने पायघन हॉस्पिटल समोर जबर धडक देऊन मुलाला फरफटत नेत गंभीर जखमी केले. ग्रामस्थांनी मुलाला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
याबाबत सोमवारी दि. १७ मार्च रोजी, कंजरवाडा परिसरात लवकरात लवकर ४ ते ५ स्पीडब्रेकर टाकण्यात यावे, या संदर्भात जळगांव मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेण्यात आली.