---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

दुर्दैवी! विद्यूत खांबाचा धक्का लागल्याने चिमुकलीचा मृत्यू, मोठी बहीण थोडक्यात बचावली

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२३ । जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात विद्यूत खांबाला धक्का लागल्याने तीन वर्षाची चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची दुदैवी घडली. बावली रूमला पावरा (वय-३) रा. नशिराबाद ता. जि. जळगाव असे मृत बालिकेचे नाव आहे. यावेळी दैव बलवत्तर म्हणून बावलीसोबत असलेली तिची मोठी बहीण बचावली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

shock jpg webp

नशिराबाद गावातील चंदन सोपान पाटील यांच्या शेतात गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ईश्वर पावरा त्यांची आई, वडील, पत्नी आणि तीन मुलीसोबत वास्तव्याला आहेत. त्यांच्या घराच्या बाजूनेच विद्यूत तारा गेलेल्या आहेत. ईश्वर पावरा कामाच्या निमित्ताने बाहेरगाव गेले होते. रविवारी सकाळी ईश्वरची सर्वात लहान मुलगी बावली ही आपल्या दोन मोठ्या बहिणींसोबत झोपडीजवळ खेळत होती.

---Advertisement---

ज्या ठिकाणी या तिघी खेळत होत्या, त्या ठिकाणी असलेल्या विजेच्या लोखंडी खांबामध्ये विजेचा प्रवाह उतरलेला होता. मात्र ही गोष्ट मुलींना माहिती नव्हती किंबहुना कुटुंबियांचं देखील याकडे लक्ष नव्हतं. यादरम्यान तिथे खेळणाऱ्या बावलीला विजेच्या खांबाला धक्का लागला. यात तिचा जागीच दुदैवी मृत्यू झाला.

यावेळी बावली हिच्या मोठ्या बहिणींना थोडा वेळ काहीच कळलं नाही, पण बावली जमिनीवर कोसळल्यावर त्यांना काहीतरी झाल्याचं लक्षात आलं. त्यांनी आरडाओरडा केला. यावेळी शेजारी दुसऱ्या झोपडीत राहणाऱ्या तिच्या नातेवाईकांनी बावलीला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बावलीला मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---