---Advertisement---
जळगाव जिल्हा गुन्हे

‘मी डॉन आहे, तू माझ्यासोबत नाही आली तर..’ महिलेचा विनयभंग ; जळगावात गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । राज्यात महिलांसह अल्पवयीन मुलीवर होणारा अत्याचार, विनयभंगाच्या घटना सातत्याने समोर येत आहे. यामुळे महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच जळगावातून ३५ वर्षीय महिला विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

Untitled design 15 jpg webp webp

मी डॉन आहे, त्यामुळे तू माझ्यासोबत नाही आली तर तुला उचलून नेईल अशी धमकी देत, शहरातील केळकर मार्केटमध्ये मार्केटींगचा व्यवसाय करणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी सोमवारी शहर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---Advertisement---

शहरातील एका भागात ३५ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला असून, त्या मार्केटींगचा व्यवसाय करतात. त्या सोमवारी जळगाव शहरातील केळकर मार्केटमधील एका दुकानात गेल्या असता, सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी भोला लक्ष्मण सोनवणे याने महिलेसोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केला, तसेच मी इथला डॉन आहे, तुला उचलून नेईल असे सांगून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी शहर पोलिस ठाण्यात भोला सोनवणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला सहायक फौजदार संगीता खंडारे या करीत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---