---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली लावला साडेसहा लाखाचा चुना ; जळगावात गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२३ । फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे. अनेकवेळा खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात असूनही फसवणुकीला अनेक लोक बळी पडत आहे. अशातच कर्ज मंजूर करून देण्याच्या नावाखाली दोघांना साडेसहा लाख रुपयाचा चुना लावण्यात आला आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

state bank fraud of rs 1 5 crore crime against 17 persons including bank valuers jpg webp

नेमका काय आहे प्रकार?
शहरातील राका पार्कमध्ये पराग प्रभाकर भावसार हा तरुण वास्तव्यास असून पराग हा जून २०२१ त्याचा मामेभाऊ भूषण अविनाश भावसार रा. तिडके नगर, नाशिक यांच्याकडे दाक्षायणी फायनान्सशियल सर्व्हिसेस कंपनीत शाखाधिकारी म्हणून नोकरीला होता. सोशल मीडियावर कंपनीचा प्रचार करीत असतांना ओमप्रकाश पाटील आणि राहूल हिलाल देवरे हे दोघे परागच्या संपर्कात आले. भूषण भावसार याने त्यांना सीएसआर फंडबद्दल माहिती देवून कर्ज मंजूर होणार असल्याचे सांगितले.

---Advertisement---

परंतु त्यापुर्वी प्रोसेसिंग फी म्हणून दोघांकडून साडेसहा लाख रूपये भरण्यास भूषण भावसार याने सांगितले. त्यानुसार ओमप्रकाश पाटील आणि राहूल देवरे यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून रक्कम ट्रान्सफर केली. त्याचा पुरावा म्हणून शाखाधिकारी पराग भावसार यांच्या नावाने नोटरी देखील करुन दिली.

अनेक महिन्यांचा कालावधी उलटून देखील संबंधित कर्जाबाबत पराग भावसार व दोन्ही ग्राहकांनी भुषण भावसार यांच्याकडे पाठपुरावा करीत होते. परंतु सुरुवातीला त्यांना काम सुरु असल्याचे सांगत वेळ मारुन नेली. मात्र काही दिवसानंतर त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ओमप्रकाश पाटील व राहुल देवरे यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. याबाबत रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---