गुन्हेजळगाव शहर

फेसबुकवरील ओळख भोवली ; लग्नासाठी तरुणाचा हट्ट, तरुणीने नकार देताच.. जळगावातील धक्कादायक प्रकार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२३ । महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणारे अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबत नसून अशातच जळगावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फेसबुकवर ओळख झालेल्या मुलाने वेळोवेळी मुलीचा पाठलाग करत तिला त्रास दिला. “माझ्याशी लग्न कर नाहीतर, तुझ्या वडिलांना मारुन टाकेन”, अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीस आला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची जानेवारी महिन्यात फेसबुकच्या माध्यमातून जळगाव शहरातील एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली. यातून दोघंही एकमेकांशी चॅटींगवर बोलू लागले. त्यानंतर महिनाभरानंतर आरोपी मुलगा १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेटाईन डेच्या दिवशी मुलीचा विश्वास संपादन करत तिला जळगाव शहरात लगत असलेल्या एका तलाव परिसरातील जंगलात फिरायला घेऊन गेला.

त्याठिकाणी मुलाने मुलीसोबत तिला लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करत तिचा विनयभंग केला. यानंतर मुलाने वेळोवेळी मुलीचा पाठलाग करत तिला त्रास दिला. मात्र या त्रासाला कंटाळून ६ मार्च रोजी मुलीने तिच्या वडिलांना एक मुलगा सतत पाठलाग करत असतो, असं सांगितलं. ही माहिती ऐकून मुलीच्या वडिलांना धक्काच बसला. त्यानंतर वडिलांनी दुसऱ्या दिवशी शनिपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.

तक्रारमध्ये मुलगा मुलीशी अधूनमधून रात्री बेरात्री अश्लिल चॅटींगसुध्दा करतो. “माझ्याशी लग्न कर”, असं मुलीला म्हणत असतो आणि “लग्न नाही केलं तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन”, अशी धमकी यादरम्यानच्या काळात मुलाने मुलीला दिल्याचं तक्रारीत नमूद आहे. या तक्रारीवरुन मुलीला त्रास देत तिचा विनयभंग करणाऱ्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलाविरोधात विनयभंग तसेच बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरिक्षक प्रिया दातीर या करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button