जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाला असून अशातच जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथील दहावीच्या परीक्षा केंद्राबाहेर स्वतः शिक्षकांकडून कॉपी साठी मदत केली जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. या व्हायरल व्हिडीओनंतर संबधित किनगावच्या (ता. यावल) मुख्याध्यापक, शिक्षक व एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

यावल तालुक्यातील किनगाव येथील परीक्षा केंद्रावर मराठीचे पेपरला विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी केंद्रावर रिक्षात बसून कॉपी तयार करणाऱ्या मुख्याध्यापक शिक्षक व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर यावल पोलिसांत शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल तालुक्यातील किनगाव येथील दहावीच्या परीक्षा केंद्र असलेल्या नेहरू माध्यमिक विद्यालय येथे मराठीचा पेपर होता. सकाळी मराठी द्वितीय- तृतीय विषयाचा पेपर असताना माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना फोन आला होता की, एक ऑटो रिक्षा सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला तायडे तेथील शिक्षक अंमल भारी लाव व त्यांच्या सोबत अजून एक महिला आशा युसुफ पटेल हे तिघेजण कॉफी पुरविण्याच्या उद्देशाने अपेक्षित प्रश्नसंचातून प्रश्न उत्तर पाहून कॉपी बनवत आहे. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधित शिक्षिकांविरोधात तक्रार दाखल करून कारवाईसाठी अहवाल सादर करा असे आदेश दिले होते. त्यानुसार यावल पोलीस ठाण्यात मुख्याध्यापिका शिक्षक व एक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.