⁠ 
शनिवार, डिसेंबर 14, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | खळबळजनक! १४ वर्षीय मुलीवर सात तरुणांचा अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती; पाचोऱ्यात गुन्हा दाखल

खळबळजनक! १४ वर्षीय मुलीवर सात तरुणांचा अत्याचार, पीडित मुलगी गर्भवती; पाचोऱ्यात गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२३ । पाचोऱ्याच्या नैतिकतेला व वैभवाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील १४ वर्षीय मुलीचा तरुणांनी विनयभंग करत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धक्कादायक म्हणजे या अत्याचारातून पीडित मुलीला गर्भधारणा झाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे

पाचोरा शहरातील या धक्‍कादायक प्रकरणात पीडित मुलगी २७ एप्रिलला घरातून काही न सांगता निघून गेल्याने तिच्या आजीने नात बेपत्ता झाल्याचे पोलिसांना सांगितले होते. पोलिस उपनिरीक्षक विजया वसावे यांनी तिचा शहरभर शोध घेतला असता ती २८ एप्रिलला भडगाव रोड भागातील एका हॉटेलमध्ये जेवण करताना आढळून आली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशी करून तिला जळगाव येथे बालकल्याण समितीकडे रवाना केले होते. तेथील यंत्रणेने तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे निदान झाल्याने समितीने पाचोरा पोलिसांना माहिती कळवली.

उपनिरीक्षक विजया विसावे यांनी जळगाव येथे जाऊन युवतीची सखोल चौकशी केल्यावर तिने आपबीती कथन केली. पीडितेने संशयित सात तरुणांनी वेळोवेळी विनयभंग करीत शारिरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सांगितले.

घटनास्थळ आणि घटनेतील संशयितांची ओळख पटविण्यासाठी पीडितेला पाचोरा येथे आणले असता तिने सातही तरुणांची ओळख पटवली. पीडिता अल्पवयीन असल्याने तिच्या ६५ वर्षीय वृद्ध आजीने पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, सामूहिक बलात्कार आदी कलमांसह पोस्को अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यांच्यासह आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंग देशमुख तपास करीत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.