…म्हणून आ. गिरीश महाजनांसह १० जणांविरोधात गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । कोर्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जमाबवंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह १० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीच्यावतीने सोमवार दि.१ रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ‘महाआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. मोर्चात आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी व शेतकरी सहभागी झाले होते. या मोर्चात हजारो लोकांचा जमाव जमला होता.
दरम्यान, या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने याप्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदुलाल पटेल, आ. संजय सावकारे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द पो.कॉ. राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.