⁠ 
मंगळवार, मे 21, 2024

पोलीसाला मारहाण करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२२ । शहरात कौटुंबिक न्यायालयात जळगाव शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथला आणल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आतिश बरसे व अमित बरसे असे पोलिसाला मारहाण करणाऱ्या दोघा भावांचे नाव आहे. बापुराव मोरे जळगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोमवारी त्यांना डायल ११२ या शासकीय पोलीस वाहनावर आरटीपीसी ड्युटीवर असताना सायंकाळी राजेश सुभाष पाटील (रा.कुरंगी, ता.पाचोरा) यांनी आम्हाला मारहाण होत असल्याचे सांगत मदत मागितली. त्यानुसार मोरे व हवालदार अय्युब पठाण शहरातील बी.जे. मार्केटमधील कौटूंबिक न्यायालयात पोहोचले. तेथे मोरे यांनी कोणी कॉल केला व काय मदत हवी?, अशी विचारणा केली. त्यावेळी तेथे राजेश पाटील त्यांची भाची गायत्री मच्छींद्र पाटील हिचा न्यायालयात पती आतिष बारसे याच्यासोबत घटस्फोट झालेला आहे. त्यामुळे चिडून आतिष हा बहिण दिपाली हिच्या अंगावर धावून आला तर चुलत मेहुणे रवींद्र पाटील यांना मारहाण केल्याचे राजेश पाटील यांनी पोलिसांना सांगितले. त्यावर मोरे यांनी तुम्हाला पोलिसात तक्रार द्यायची आहे का? नसेल तर खाली सोडतो असे सांगितले.

मोरे यांनी तक्रार द्यायची तयारी दर्शविल्याने या सर्वांना पोलीस वाहनात बसविल्यावर आतिष याने उजव्या बाजुचा दरवाजा जोरात उघडून गायत्री पाटील हिला हात धरुन बाहेर ओढले. त्यावर मोरे यांनी सरकारी वाहनाचा दरवाजा का उघडला?, असा जाब विचारला. यानंतर आतिष याने मोरे यांच्या कानशिलात लगावली. त्याचा भाऊ अमित याने देखील या पोलिसांशी धक्काबुक्की केली. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना मदतीसाठी बोलावून घेण्यात आले. तेथून या दोघं भावंडांना शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पहाटेच्या सुमारास दोघं भावंडाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.