⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | जळगाव जिल्हा | तहसीलदारांची बनावट सही भोवली ; महसूल सहायकाविरुध्द गुन्हा दाखल

तहसीलदारांची बनावट सही भोवली ; महसूल सहायकाविरुध्द गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 18 फेब्रुवारी 2024 । जमिनीच्या भोगवाटा परवानगी पत्रावर महसूल सहायकाने तहसीलदारांची बनावट सही केल्याचा प्रकार समोर आला आहे. यातून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित महसूल सहायक गजानन नरोटे याच्याविरुद्ध येथील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे.

बोदवड येथील नवीन अविभाज्य शर्तीच्या जमिनीचे भोगवाटा वर्ग एकमध्ये रूपांतर करून कृषकसाठी विक्री परवानगी मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित शेतकन्याने अर्ज केला होता. त्यानुसार सदर मिळकतीच्या बाजार भावाच्या मूल्यांकन रकमेच्या ७५ टक्के रक्कम, ३ लाख २६ हजार रूपये सरकारी खजिन्यात जमा करण्याविषयी संबंधित शेतकऱ्यांना २७ जानेवारी २०२३ रोजी तत्कालीन तहसीलदार पंकज लोखंडे यांच्या सहीनिशी कळविण्यात आले होते. याच अर्जदारांना पुन्हा एका पत्राव्दारे ३ नोव्हेंबर २०२३ रोजी बाजारभाव मूल्यांकन रकमेच्या ५० टक्के रक्कम, दोन लाख २४ हजार १६३ रुपये जमा करण्याबाबत कळविण्यात आले. तसेच या पत्रावर तत्कालीन तहसीलदार लोखंडे यांनी स्वाक्षरी बनावट असल्याचे लक्षात आले. ही बाब अव्वल कारकून गणेश हटकर यांनी नंदुरबार येथे बदली झालेल्या लोखंडे यांना कळविली.

लोखंडे यांनी खातरजमा केली असता महसूल सहायक गजानन नरोटे याने तहसीलदारांच्या पदनामाच्या बाजूला स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. याशिवाय सदर जमीन विक्री परवानगी आदेशावरदेखील बनावट स्वाक्षरी असल्याचे आढळून आले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.